Osmanabad news :-
उस्मानाबाद जि. प.च्या प्रशासकपदाचा कार्यभार राहुल गुप्ता यांनी स्वीकारला
उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाचा कार्यभार आज जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वीकारला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजळ शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन ) डॉ. नितीन दातार, उपमुख्य कार्यकरी अधिकारी (स्वछता व पाणी पुरवठा) आनंत कुंभार, जि.प. चे कॅफो सुरेश केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थंकर, आदी उपस्थित होते.