सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी स्थानिक खासदारांचा काम न करता फक्त दिखावाच - भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे

0


Osmanabad news : 
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी स्थानिक खासदारांचा काम न करता फक्त दिखावाच - भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे 

लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबादचे खासदार वेळोवेळी बैठका घेऊन लोकांना सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग प्रगतीबाबत अवगत करत असतात. केंद्राकडून आजवर एकूण ३२ कोटींचा निधी मिळालेला आहे, तर राज्याला स्मरणपत्र देऊनही "ठाकरे सरकारने राज्याचा वाटा अजून का दिला नाही? किंवा दिला का?" हे खासदारांनी अवगत करून घेतल्यास त्यांना नागरिकांना तसे सांगता येईल..भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले की, उस्मानाबाद तुळजापूरच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेसाठी केंद्र सरकारने २०२१-२२ या वर्षात २२ कोटी तर यावर्षी १० कोटी असा एकूण ३२ कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला दिलेल्या स्मरण पत्रास देखील ८ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. पण ठाकरे सरकारला त्यात काहीच स्वारस्य दिसत नाही. राज्यात ठाकरे सरकार असल्यामुळे खासदार वेळोवेळी त्यांच्याकडेही पाठपुरावा करत असणारच, असे सर्वजण गृहीत धरतात.. त्यामुळे सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेसाठी आणि पर्यायाने या परिसराच्या प्रगतीसाठी गांभीर्याने कार्य करत आहेत, हे निधी देऊन त्यांनी दाखवायला पाहिजे होते, ही जनतेची भावना आहे, असेही नितीन काळे यांनी नमूद केले. आदरणीय खासदार याबाबत पाठपुरावा करत आहेत, असे भासवले जाते आणि त्यांच्याच पक्षाचे सरकार राज्यात सत्तेत असताना त्यांचे आजवर ऐकले गेले नाही, हे खरे समजावे का? आता ही दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आल्यावर तरी परिस्थिती बदलेल का ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top