उस्मानाबाद जिल्ह्यात जयंती व धार्मिक उत्सवानिमित्त दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
Osmanabad news : -
उस्मानाबाद.दि.13( osmanabad ):- उस्मानाबाद जिल्हयात दि. 14 एप्रिल 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती हे उत्सव साजरा होत आहेत. या कालावधीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मुबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील सर्व देशी, विदेशी, एफएलबीआर-2, परवानाकक्ष अनुज्ञप्त्या दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. कळंब तालुक्यातील मौजे येरमाळा येथे श्री. येडेश्वरी देवी : - उत्सव -2022 साजरा होणार आहे. या यात्रेकरीता मोठया प्रमाणात भाविक दर्शनाकरीता येत असतात. दि. 16 आणि 17 एप्रिल 2022 या दोन दिवशी देवीजींची पालखी मिरवणूक तसेच इतर धार्मिक कार्यक्रम असल्याने यात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. या दिवशी यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता रहावी या दृष्टिने देवी मंदिर परिसरातील तसेच येरमाळा गावातील सर्व देशी, विदेशी दारु दुकाने आणि बिअरबार, परमिटरुम दि. 16 आणि 17 एप्रिल 2022 या दोन दिवशी दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश श्री.दिवेगावकर यांनी दिले आहेत.
****