Osmanabad news
छत्रपती शाहूमहाराजांची जयंती उत्साहात साजरी
उस्मानाबाद,दि.28(जिमाका): दि. 26 जुन हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस प्रती वर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने उस्मानाबाद जिल्हयामध्ये जिल्हास्त्र , तालुकास्त्र , गावपातळीवर सामाजिक न्याय दिन दि. 26 जुन 2022 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.
जिल्हास्तरावर दि. 26 जुन 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता शिक्षणाधिकारी (माध्य्मि क) जि.प. गजानन सुसर, सहाय्य्क आयुक्त् , समाज कल्याण, बाबासाहेब अरवत आणि उपशिक्षणाधिकारी (माध्य्मि.क) जि. प. श्रीमती. गायकवाड , तसेच प्रस्तुत कार्यालयातील व इतर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील 10 विद्यालयाचे जवळपास 1000 विद्यार्थी उपस्थ्िाात होते.
समता दिंडी मल्टीपर्पज हायस्कुल उस्मानाबाद येथून निघून प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयास अभिवादन करुन यशवंतराव चव्हाण सभागृह , जि. प. उस्मानाबाद येथे समता दिंडीचा समारोप झाला. समारोप प्रसंगी समता रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. त्यानंतर सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी ठिक 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नागनाथ चौगुले, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. जिल्हा स्तरावरील कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अरवत यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य विकास सरनाईक , आर.पी. कॉलेज उस्मानाबाद यांनी शाहू महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात जिल्हयातून सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांस राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार , इयत्ता 10 वी च्या परिक्षेत विशेष प्राविण्य् मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनु.जातीच्या मुलां-मुलींना गौरवपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. निबंध / वक्तृत्व् स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हयातील तृतीयपंथी व्यक्तींना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र वितरीत करण्यात आले.
श्री.शिवकुमार स्वामी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक , माध्य्मि क आश्रमशाळा बावी जगताप बी.यु. यांनी कार्यक्राचे सुत्र संचालन केले आणि समाज कल्याण निरीक्षक, युवराज भोसले यांनी आभार मानले.
****