शेळगाव येथे कृषी संजीवनी मोहिमे-अंतर्गत पेरणीपूर्व मार्गदर्शन

0
शेळगाव येथे कृषी संजीवनी मोहिमे-अंतर्गत पेरणीपूर्व मार्गदर्शन

बातमी संकलन - विजय शेवाळे

 शेळगाव:- परंडा तालुक्यातील शेळगाव येथे दि 28/06/2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये कृषि संजीवनी मोहीम अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात आले ,दहा टक्के खत बचत मोहीम ,बीज प्रक्रिया तसेच कडधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत उडीद बियाणे साठी सोडत पद्धतीने शेतकरी निवड करून परमिट वाटप करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, यांत्रिकीकरण या विषयी तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब रुपनवर साहेब व कृषी अधिकारी श्री कैलास देवकर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कृषी सहाय्यक श्री डी आर वळसे  यांनी विविध कृषी विभागाची  योजनांची माहिती सांगितली. यावेळी अँड सुभाष भाऊ मोरे,सरपंच विष्णू नाना शेवाळे,उपसरपंच राजेंद्र जगताप विलास मोरे .विलास दैन रामभाऊ जामदारे.बाबु दैन. शिंदे आप्पा व शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top