उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई
Osmanabad news :-
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 06 जून रोजी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 4 गुन्हे नोंदवले आहेत.
1) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांनी दोन ठिकाणी छापे टाकले असता सुजित गायकवाड हे अंबेहोळ गावातील एका झाडाखाली 15 लि. हातभट्टी दारु तर चंद्रकांत गव्हाण हे सोनेगाव येथील आपल्या घरासमोर 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) बेंबळी पोलीसांना सोपान लोखंडे हे तोरंबा गावातील आपल्या घराजवळील अंगणात 18 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
3) भुम पोलीसांना अनिल देवकर हे इराचीवाडी शिवारात 23 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
4) उमरगा पोलीसांनी पळसगाव तांडा तलावालगतच्या झुडपांत छापा टाकला असता गोपीनाथ राठोड व बाबू राठोड हे दोघे गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा आंबवलेला 1,800 लि. द्रव पदार्थ 9 पिंपांमध्ये व प्रत्येकी 15 लि.च्या 5 घागरीमध्ये एकुण 75 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले. तो द्रव पदार्थ नाशवंत असल्याने पोलीसांनी तो जागीच ओतून नष्ट केला असून मद्य जप्त केले आहे.
(पळसगाव तांडा येथील अवैध मद्य विरोधी कारवाईची छायाचित्रे.)