कोव्हीड- १९ रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घ्याव्या - छावा संघटनेची मागणी

0

कोव्हीड- 19 रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घ्याव्या - छावा संघटनेची मागणी

 उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोव्हीड- 19 रोगाचे एकुण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 79 आहे . सदर रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे . त्यामुळे कोव्हीड 19 रोगाचा प्रादुर्भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे . परिणामी त्याचा परिणाम विद्यार्थी , शिक्षक व इतर कर्मचारी वर्गावरती होण्याची दाट शक्यता आहे . त्यामुळे मा. कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांना मा. संचालक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र, उस्मानाबाद यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले की विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्याव्यात . अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे,परीक्षा ऑनलाइन न घेतल्यास  होणाऱ्या परिणामास विद्यापीठ सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख राकेश पवार,नितीन घेणे, शुभम सुर्यवंशी, चंद्रकांत जानराव,पांडगडे वामन, आदित्य कदम, मयुर मैदरकर,शिवराज मराठे, सतिश माकोडे, योगेश कोरेकर, तारेख काझी आदीं सह विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top