कम्युनिटी पोलीसींग स्कीम (CPC) अंतर्गत शाळेला भेटी

0


कम्युनिटी पोलीसींग स्कीम (CPC) अंतर्गत शाळेला भेटी

 

कम्युनिटी पोलीसींग स्कीम अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे यांसह पथकाने नळदुर्ग येथील जिल्हा परिषद शाळेस तर मुरुम पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि- श्री. डॉ. रंगनाथ जगताप यांसह पथकाने मुरुम येथील जिल्हा परिशद शाळेस आज दि. 02 जुलै रोजी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थीनींना पोलीस काका, पोलीस दिदी यांची ओळख करुन देउन पोलीसांविषयी समज- गैरसमज, वाहतुक नियम, बाललैंगीक अत्याचार, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, हेल्प लाईन 112, 1098 तसेच सोशल मिडियां विषयीच्या गुन्ह्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top