उस्मानाबादच्या धाराशिव नामकरणनंतर भाजप- शिवसेनाच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष

0

उस्मानाबादच्या धाराशिव नामकरणनंतर भाजप- शिवसेनाच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष

 

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभागजिल्हातालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

 जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे व खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे असे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी म्हणले.

याच अनुषंगाने भाजपा व शिवसेना कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,धाराशिव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक धाराशिव येथे एकत्र येऊन फटाक्यांची अतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून घोषणा देत निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळेसुनील काकडेसूरज साळुंखेइंद्रजित देवकतेपांडुरंग लाटेअभय इंगळेराहुल काकडेप्रविण सिरसाठेदाजीप्पा पवारनामदेव नाईकलसंदीप इंगळेप्रितम मुंडेसुजित साळुंखेअमोल राजेनिंबाळकरगणेश एडकेप्रविण पाठकअमोल पेठेमेसा जानरावशेषेराव उंबरेमोहन मुंडेसलमान शेखगणेश इंगळगीवैभव हांचाटेअमित कदमसागर दंडनाईकसुनील पंगुडवालेधनराज नवले व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top