उस्मानाबाद जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस आज दि. 17 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उस्मानाबाद शहरात शिवसेनेच्या वतीने अन्नपूर्णा ग्रुपमार्फत अन्नदान करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसह गोरगरीब, गरजूंनी या अन्नदानाचा लाभ घेतला.
उस्मानाबाद शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आज जन्म घेतलेल्या बालकास कपडे आणि मातेला साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. आज जन्मलेल्या बालकाचा पुढील वाढदिवस खा. ओमदादा यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच येणार असल्याने या बालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास (दादा) पाटील म्हणाले की, पक्षनिष्ठेबरोबर जनतेच्या कामाशी सुद्धा एकनिष्ठ राहून सर्वांच्या सुखःदुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे कौशल्य जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादांकडे आहे. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे आज जिल्ह्यातील शिवसेना भक्कमपणे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांच्या पाठीशी उभी असल्याचेही ते म्हणाले.
मा.नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर म्हणाले की, धाराशिव जिल्ह्याला खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर यांच्या रुपाने अद्वितीय नेतृत्व लाभले आहे. लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा, सर्वसामान्यांचे फोन घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलणारे ओमदादा जनतेचे लोकप्रिय खासदार झाले आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास दादा पाटील, मा.नगराध्यक्ष, मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, धाराशिव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री विजय सस्ते धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख श्री सतिशकुमार सोमाणी तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष श्री रवी कोरे आळणीकर शिव अल्पसंख्याक चे जिल्ह्याप्रमुख अमीर शेख नगरसेवक श्री सोमनाथ गुरव बाळासाहेब काकडे मा.जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे जेष्ठ शिवसैनिक भीमा अण्णा जाधव दिनेश बंडगर उपतालुकप्रमुख दादा कोळगे विभागप्रमुख श्री अमोल मूळे श्री व्यंकट गुंड श्री आबा सारडे श्री मुकेश पाटील श्री राजेंद्र तुपे श्री राजेंद्र भांगे श्री अमोल थोडसरे युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर युवासेना उप तालुकाप्रमुख अविनाश इंगळे घाटंग्री गावचे उप सरपंच सचिन जाधव सौदागर जगताप मुन्ना खटावकर गणप्रमुख श्री पोपट खरात अनिल बागल नेताजी गायकवाड सुरेश पौळ विष्णू ढवळे सचिन देशमुख शिवसैनिक चेतन वाटवडे महेश लिमये शिवलाल कुऱ्हाडे प्रीतम जाधव गणेश सगर सुरेश गवळी राज राठोड ओंकार सारडे नामदेव कांबळे बालाजी सुरवसे अविनाश अगाशे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.