भाजपा जिल्हा कार्यकारणीची २९ जुलै रोजी बैठक

0

२९ जुलै रोजी भाजपा जिल्हा कार्यकारणीची बैठक

 

भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी बैठक दिनांक २९ जुलै २०२२ रोजी दुपारी १ वाजता भाजपा कार्यालय (प्रतिष्ठाण भवन धाराशिव) येथे आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीला मा.आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, मराठवाडा संघटनमंत्री संजयभाऊ कौडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या बैठकीत हर घर तिरंगा व दि.२३ जुलै २०२२ रोजी मुंबई (पनवेल) येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतील विषयावर अधिक चर्चा होणार आहे, तरी या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारीतालुका पदाधिकारीयुवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी, सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top