अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांना आवाहन
उस्मानाबाद,दि.27(जिमाका) उस्मानाबाद जिल्ह्याकरिता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. त्याकरिता अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे दि. 05 ऑगस्ट 2022 पुर्वी जमा करावे. असे आवाहन उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन यांनी केले आहे.
या योजनेतंर्गत फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे,अर्जदाराकडे स्वमालकीची कमीत कमी 1 हेक्टर जमीन आवश्यक आहे योजनेचा लाभ एका व्यक्तीसाठी अधिकतम 1 हेक्टरसाठी पात्र असेल,वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी 1 हेक्टर क्षेत्राकरिता 0.5 कि.ग्रॅ.शेवगा बियाणे येथील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय यांच्याकडून पुरवठा केल जाईल,लाभार्थीस 1 हेक्टर करिता रु. 30 हजार अनुदान देय असुन त्यामध्ये रु. 6 हजार 750/- किंमतीचे बियाणे पुरविणेत येईल व उर्वरित रु. 23 हजार 250/- मध्ये खालील बाबींचा समावेश असेल,सेंद्रिय खते, रासायनिक खते,कीटकनाशके इ. 5 हजार 250 रुपये,मशागत खर्च 12 हजार रुपये,इतर अनुषंगिक किरकोळ खर्च विद्यूत-इंधन खर्च,वाहतूक खर्च इ. 6 हजार असे एकूण रु. 23 हजार 250/- अनुदानाची रक्कम लाभार्थीस रु. 11 हजार 625/- च्या दोन समान हप्त्यात बँक खात्यात डी.बी.टी.द्वारे जमा करण्यात येईल अनुदानाचा पहिला हप्ता बियाणाची लागवड केल्यानंतर आणि दुसरा हप्ता लावगडीनंतर एक वर्षाने देय असेल.
या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील 15 लाभार्थींना लाभ द्यावयाचा आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय उस्मानाबाद या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. असे पशुसंवर्धन उपआयुक्त,कार्यालयाने केले आहे.
*****