नळदुर्ग पोलिसांचा अवैध दारु विक्री विरोधी छापा

0


नळदुर्ग पोलिसांचा अवैध दारु विक्री विरोधी छापा


नळदुर्ग पोलीस ठाणे :  मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन नळदुर्ग पो.ठा. चे पथक काल दि. 26 जुलै रोजी पोलीस ठाणे हद्दीत अवैध मद्य विरोधी कारवाई करीता गस्तीस होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सिंदगाव व चिवरी येथे छापे टाकले. यावेळी सिंदगाव ग्रामस्थ- काशीनाथ भिमशा धोत्रे हे आपल्या पत्रा शेडमध्ये 193 बाटल्या विदेशी दारु व 15 बाटल्या देशी दारु असा एकुण अंदाजे 40,630 ₹ किंमतीचा दारु साठा बाळगलेले आढळले. तर तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामस्थ- दादाराव गणपती शिंदे हे गावातील महालक्ष्मी मंदीराच्या बाजूस 70 बाटल्या देशी- विदेशी दारु असा एकुण अंदाजे 7,855 ₹ किंमतीचा दारु साठा बाळगलेले आढळले. यावर पथकाने नमूद दोन्ही ठिकाणचा मद्य साठा जप्त करुन काशीनाथ धोत्रे व दादाराव शिंदे यांच्याविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे 232 व 233/2022 हे महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत नोंदवले आहेत.

            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे, पोहेकॉ- जितेंद्र कोळी, संतोष सोनवने, गौतम शिंदे, पोकॉ-मनमीथ पवार यांच्या पथकाने केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top