जुगार खेळणा-यांवर पोलीसांची कारवाई ,३ लाखाच्या मुद्देमाल जप्त !

0


लोहारा पोलीस ठाणे : उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय उमरगा यांचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि.23 जुलै रोजी उमरगा उपविभागात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली कि, मोघा, ता. मोघा रस्त्यालगत एका पत्रा शेडमध्ये काही तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने त्या ठिकाणी 17.15 वा. सु. छापा टाकला असता तेथे 1.बाळु पाटील 2.बालाजी बंडगर 3.किशोर पाटील 4.दत्ता निर्मळे 5.मल्लीनाथ जट्टे, सर्व रा. लोहारा हे सर्व लोक तिर्रट जुगार खेळताना मिळुन आले. त्या ठिकाणाहून जुगाराचे साहित्यासह मोटारसायकल, भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण 3,13,660 ₹ चा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला असुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5 प्रमाणे लेाहारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांचे आदेशावरुन उमरगा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक- श्री. बरकते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top