तुळजापूर : नळदुर्ग शहरात येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची खबर मा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक सपोनि अमोल पवार , पोलीस नियंत्रण कक्षाचे पोउपनि- संदीप ओहोळ यांसह पोलीस पथकाने आज दि . २४ जुलै रोजी रात्री ०३.०० वा सु . नळदुर्ग येथे रवाना होउन नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि श्री सिध्देश्वर गोरे यांच्या मदतीने शहरातील तीन अवैध कत्तल खान्यावर छापे टाकले.
यावेळी गोपनीय खबरेच्या आधारे पहिला छापा ०६.१० वा सु . कुरेशी गल्ली येथे तीन छापे टाकले पहिल्या छाप्यात निजाम अजीज कुरेशी व महेगुद रहेमान कुरेशी हे दोघे अजीज कुरेशी यांच्या घरी गोवंशीय जनावरांचे अंदाजे २४,००० ₹ किंमतीचे २०० कि.ग्रॅ . मांस व तीन धारदार सत्तुर व चाकु बाळगलेले मिळुन आले.
दुसऱ्या छाप्यात अरबाज शब्बीर कुरेशी हे आपल्या घरालगतच्या बोळीत गोवंशीय जनावरांचे अंदाजे ४८,००० ₹ किमतीचे ४०० कि.ग्रॅ . मांस व एक सत्तुर व चार चाकु मिळून आले बातमीप्रमाणेच तीसऱ्या छाप्यात सादीक सत्तार कुरेशी यांच्या घरी सादीक यांसह मुन्ना नसीर कुरेशी मुदस्सर गफार कुरेशी हे गोवंशीय जनावराचे अंदाजे ३०,००० ₹ किंमतीचे २५० कि.ग्रॅ . मांस व तीन सत्तुर व पाच चाकु तसेच त्यांच्या ताब्यात कत्तलीसाठी बांधलेले दोन खॉड व एक कालवड असे तीन गोवंशीय जनावरे मिळुन आले.
यावर पथकाने अंदाजे १,३२,००० ₹ किंमतीचे गोवंशीय मांस व जीवंत तीन जनावरे जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी , अणदुर डॉ . खाडे यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद नळदुर्ग यांच्या डंम्पीगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश केले व तीन गोवंशीय जणावरे ही गो शाळेत देण्याची कार्यवाही केली आहे . या प्रकरणी पोउपनि संदीप ओहोळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम ५. ९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . सदरची कामगीरी मा . पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मा . अपर पोलीस अधीक्षक नवनीत कवित यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पवार , पोउपनि संदीप ओहोळ , पोहेकॉ माने , पोना भोजगुडे , लोखंडे , पोकॉ- जमादार , नाईकवाडी व दंगा काबू पथक यांच्या पथकाने केली आहे.