भरोसा कक्षाने महिनाभरात केली विविध शाळांत जागृती
Osmanabad news :-
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या भरोसा कक्षाच्या पोउपनि- श्रीमती हिना शेख, सपोफौ- शेंदारकर, पठाण, दहिहांडे, पोहेकॉ- माने, काशिद, आदटराव, पोना- गाढवे, लिमकर, लाव्हरेपाटील यांच्या पथकाने जुलै 2022 मध्ये उस्मानाबाद शहरातील 1)धाराशीव प्रशाला 2)अभियांत्रिकी महाविद्यालय 3)कर्मवीर बालमंदिर प्रशाला 4)सरस्वती हायस्कुल 5)आर्य चाणक्य विद्यालय 6)श्रीपतराव भोसले हायस्कूल 7)श्री. व्यंकटेश विद्यालय 8)अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा 9)ग्रीन लॅन्ड स्कुल 10)जि. प. कन्या प्रशाला 11)के.टी. पाटील संगणक शास्त्र विद्यालय 12)के.टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी 13)श्री.श्री. रविशंकर विद्यामंदीर 14)डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृह यासह बावी येथील आश्रम शाला अशा एकुण 15 शाळांना भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीसांविषयी समज-गैरसमज, मोटार वाहन कायदा- नियम, बाल लैंगीक अत्याचार संबंधाने गुड टच-बॅड टच, भारतीय दंड संहिता व पोक्सो अधिनियमांसह बालकांच्या सुरक्षे संबधी असेलेल्या योजना, डायल 112, 1091 तसेच समाज माध्यमांतील गुन्ह्यांसंदर्भात मार्गदर्शन करुन त्यांचे समुपदेशन केले. लैंगीक छेडछाड संबंधाने विदयार्थींनींना एखादी समस्या असल्यास त्यांनी न घाबरता पोलीस पथकास कळवावे. पोलीस त्या संबंधीत व्यक्तीवर नक्कीच प्रभावी कायदेशीर कारवाई करतील असे आवाहन करुन पोउपनि- श्रीमती शेख यांचा भ्रमणध्वनी क्रमांक त्यांना देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने उस्मानाबाद शहरातील कापड दुकान, एम्पोरियम अशा असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.