उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 28 जुलै रोजी 4 ठिकाणी छापे टाकले. यावेळी पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ जागीच ओतून नष्ट केला. छाप्यांतील व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई काद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.
1) ढोकी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता भंडारवाडी ग्रामस्थ- राणी कालीदास पवार ह्या 07.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर जागजी ग्रामस्थ- सुनिल नृसिंग देशमुख हे 18.00 वा. सु. गावातील सुंभा रस्त्यालगत अंदाजे 8,710 ₹ किंमतीची 69 बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.
2) येरमाळा पो.ठा. च्या पथकास कळाब तालुक्यातील वाघोली ग्रामस्थ- एकनाथ पवार हे 17.20 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
3) वाशी पो.ठा. च्या पथकास घुमटाचा फड, वाशी येथील महोदव लक्ष्मण पवार हे 09.00 वा. सु. राहत्या परिसरात गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा आंबवलेला 200 लि. द्रव पदार्थ व 10 लि. दारु असा एकुण अंदाजे 11,050 ₹ चा दव पदार्थ व गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.