तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन, १३ सप्टेंबर रोजी ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन करणार

0
तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन,
13 सप्टेंबर रोजी ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन करणार

उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न पुन्हा पेटणार,मागील काही दिवसांपासून 21 शुगर व भेरवनाथ शुगर यांच्या न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे परंतु येथील शेतकरी व व्यापारी हलाखीचे जीवन जगत आहेत तेरणेच्या सभासदांच्या अशी मागणी आहे की 21 शुगर व भैवनाथ शुगर ना कोर्टा च्या बाहेर लोकआदालती प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी पुढाकार घेऊन दोन्ही संस्थाना बोलावून तेरणा साखर कारखाना बाबत तडजोड करून तेरणा चालू करावा व 2012 पासून ते 2021-22 तेरणा सभासद यांचे ऊस घालवताना व ऊस बिल मिळण्यासाठी जी हेळसांड,नुकसान, कमी भावात ऊस घालवणे,ऊस घालवण्यासाठी भरमसाठ पैसे लागणे या सारखे नुकसान 2022-23 हंगामात टाळण्यासाठी तेरणा कारखाना तडजोड करून चालू करावा
 
तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 21 शुगर व भेरवनाथ शुगर यांनी दि 10 सप्टेंबर पर्यन्त DCC ,किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समवेत मिटिंग लावून तडजोड करावी व तेरणा कारखाना येणाऱ्या गळीत हंगामात चालू करावा अन्यथा DCC,21शुगर व भेरवनाथ शुगर यांच्या विरोधात ढोकी बसस्थांनक येथे दि 13 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे,यावेळी राहुल वाकुरेपाटील, आळणीचे सरपंच प्रमोद वीर, संजय(काका) लोखंडे, एस.के.इनामदार, अमरसिंह देशमुख, तानाजी माळी, मंगेश तिवारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top