जिल्हा न्यायालयात बूस्टर डोसच्या आयोजनास उत्सफूर्त प्रतिसाद
उस्मानाबाद,दि.25(जिमाका):- प्रमुख जिल्हा न्यायधीश तथा अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,के.आर.पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा न्यायलय येथे बूस्टर डोस देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या काही आठवडयात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी आणि विधीज्ञ यांना देणे गरजेचे होते.त्या अनुषंगाने जिल्हा न्यायालयात वैद्यकीय अधिकारी,नागरी प्रथामिक आरोग्य केंद्रचे येथील डॉ.एस.यु.खान, वैराग रोड यांच्या मार्फत आयेाजन करण्यात आले होते.या कॅम्प अंतर्गत कोविशिल्ड-95 आणि कोव्हॅक्सीन-75 असे एकूण 170 व्यक्तीना बूस्टर डोस देण्यात आले.
या कॅम्पचे आयेाजन जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्याय संकुलन, येथे करण्यात आले होते.दि.24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वाजाता ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी डॉ. खान, यांनी व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी लसीकरण यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.त्या बद्यल वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथकाचे सचिव यांन आभार व्यक्त केले.सदरचा उपक्रम यशस्वी पार पाडण्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी आतोनात प्रयत्न केले.