google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बेंबळी येथील जिल्हयातील पहिल्या महिला भवनचे लोकार्पण

सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बेंबळी येथील जिल्हयातील पहिल्या महिला भवनचे लोकार्पण

0

सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बेंबळी येथील जिल्हयातील पहिल्या महिला भवनचे लोकार्पण

 बेंबळी ता.जि.उस्मानाबाद येथे उमेद गटांच्या महिलांसाठी तुळजापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या आमदार निधीमधुन रु.10.00 लक्ष निधी ग्रामसंघ कार्यालय (महिला भवन) बांधकामासाठी देण्यात आला होता. सदरील महिला भवनचे बांधकाम पुर्ण झाले असुन मंगळवार दि.16.08.2022 रोजी त्याचे लोकार्पण जिल्हा परीषदेच्या माजी उपाध्यक्षा मा.सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बेंबळी येथील हे महिला भवन उस्मानाबाद जिल्हयातील पहिले महिला भवन असुन बेंबळी येथील महिलांसाठी एक हक्काचे कार्यालय मिळाले आहे. ज्या ठिकाणी महिला हक्काने एकत्र येऊन बसु शकतात, त्यांच्या बैठका घेऊन एकमेकींच्या अडचणी मांडु शकतात. तसेच बेंबळी येथील सिआरपी, कृषीसखी व इतर महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना “आम्हाला या पुर्वी बैठका व इतर कार्यक्रम घेण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या, परंतु आता हे स्वतंत्र कार्यालय मिळाल्यामुळे आता आम्हाला या ठिकाणाहुन कोणीही उठवुन लावु शकत नाही” असे मत व्यक्त केले व जिल्हयातील पहिले महिला भवन बेंबळी येथे दिले म्हणुन अर्चनाताईंचे आभार मानले.

जि.प. च्या माजी उपाध्याक्षा मा.अर्चनाताईंनी महिलांना मार्गदर्शन करताना बेंबळी महिला नशीबवान आहेत कारण त्यांना जिल्हयामध्ये पहिले महिला भवन मिळाले असुन सर्व महिलांना याचा फायदा करुन घ्यावा व पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना तसेच जि.प. च्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घेऊन आपापले व्यवसाय उभारुन प्रगती करावी असे आवाहन केले.

यावेळी बेंबळी च्या सरपंच सौ.वंदना कांबळे, पं.स. चे माजी सभापती श्री.बालाजी गावडे, श्री.नानासाहेब कदम, सोसायटी चेअरमन सौ.सिमंताबाई दरेकर, व्हा.चेअरमन व्यंकट सोनटक्के, संतोष आगलावे, राजाभाऊ सोनटक्के, माजी सरपंच श्री.मोहन खापरे, नंदकुमार गावडे, प्रकाश शेळके, अंकुश तानवडे, नंदकुमार मनाळे, सोसायटी संचालक मारुती निकम, अजित खापरे, नेहरु भोरे, मन्मथ बेलुरे, बाळासाहेब होनसनाळे, पांडुरंगआण्णा पवार, अशोक माळी, अजित खापरे, शाम होनसनाळे, नवनाथ कांबळे, राजाभाऊ रसाळ, महादेव गावडे, मारुती कसपटे, शीवाजी गावडे, ग्रा.पं. सदस्य विदया माने, नंदाताई रसाळ, सुशीलाबाई गावडे, अश्वीनी कसपटे, सिआरपी संजीवनी शीडोळे, शकुंतला बनसोडे, अगाशेताई इतर महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top