उस्मानाबाद एम आय एम निरीक्षक च्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
उस्मानाबाद- एम आय एम पक्षा तर्फे 16 आणि 17 ऑगस्टला बैठकीचे आयोजन उस्मानाबाद मध्ये जिल्हा प्र. अध्यक्ष मुस्तफा खान व शहर अध्यक्ष अज़हर सय्यद यांच्या नियोजनात पार पडली.
प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशावरून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक औरंगाबाद जिल्ह्याचे शारिक नक्शबंदी, शोएब शेख तसेच मुक्तार अहमद यांची विशेष उपस्थिती होती.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व कार्यकर्त्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या निरीक्षक कानी उस्मानाबादचे नामवंत लोकांशी संपर्क केला व जनतेशी संपर्क साधून त्यांच्या पक्षाबाबत सुजाव ऐकून घेतले तसेच पक्षवाढीसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना जोमाने काम करण्यासाठी अपील केली येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती सर्व निवडणूक एम आय एम पूर्ण ताकतीने लढतील असा कार्यकर्त्यांना निरीक्षकाला कडून सांगण्यात आला.
या वेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे निरीक्षक टीम शारिक नक्शबंदी, शोएब शेख ,मुक्तार अहमद, उस्मानाबाद जिल्हा प्र. अध्यक्ष मुस्तफाखान शहराध्यक्ष अझर मुक्तार सय्यद उस्मानाबाद तालुकाध्यक्ष मोहसिन शेख,परंडा तालुका अध्यक्ष जमीर पठाण, भूम तालुका अध्यक्ष ऐजाज काझी,तुळजापूर तालुका अध्यक्ष मन्सूर भाई, कळब तालुका अध्यक्ष वाजिद काझी, व जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.