येरमाळा येथे गावठी दारु निर्मीतीचा अड्डा उद्ध्वस्त
येरमाळा पोलीस ठाणे : येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक पो.ठा. हद्दीतील अवैध मद्य विरोधी कारवाई साठी आज दि. 25 ऑगस्ट रोजी पहाटे पासून गस्तीस होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने 13.10 वा. सु. कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथे गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे ग्रामस्थ- अनिता जितेंद्र पवार ह्या गावठी दारु निर्मीती करताना आढळल्या. घटनास्थळी गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 510 लिटर आंबवलेला द्रव हा लोखंडी- प्लास्टीक पिंपांत आढळला. तसेच 18 लि. गावठी दारु असा एकुण अंदाजे 30,800 ₹ किंमतीचा माल आढळला. यातील गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट करुन मद्य जप्त केले. यावर नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) (फ) अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन येरमाळा पो.ठा. चे सपोनि- श्री. दिनकर गोरे, पोउपनि- श्री नाईकवाडे, सपोफौ- मुंडे, सरक, पोहेकॉ- गिरी, जवळगावकर, पठाण, पोना- शिंदे, चोपदार यांच्या पथकाने केली आहे.