उस्मानाबाद पोलिसांची अवैध मद्य विरोधी सात ठिकाणी कारवाई.

0
Osmanabad :  अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 24 ऑगस्ट रोजी 9 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातील देशी- विदेशी दारुच्या 66 बाटल्या, 74 लि. गावठी अशी दारु जप्त करुन 330 लि. गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पोलीसांनी तो जागीच ओतून नष्ट केला. गावठी दारु निर्मीतीच्या द्रव पदार्थासह जप्त केलेल्या एकुण मद्याची अंदाजे किंमत, 27,120 ₹ असून छाप्यादरम्यान संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

1) कळंब पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात जनी दुध डेअरी, कळंब येथील- शेलाबाई पवार ह्या 21.05 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर तर मस्सा, ता. कळंब येथील मंगल काळे ह्या 21.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा आंबवलेला अनुक्रमे 160 लि. व 170 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असतानो पथकास आढळल्या.

2) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने तेरखेडा येथे दोन ठिकाणी छापे टाकले असता यात खामकरवाडी ग्रामस्थ- ताईबाई काळे ह्या 19.30 वा. सु. कडकनाथ वाडी रस्त्यालगतच्या एका हॉटेलजवळ 42 बाटल्या देशी- विदेशी दारु व 5 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर तेरखेडा ग्रामस्थ- अजय सरवदे हे 21.05 वा. सु. गावतील कडकनाथवाडी रस्त्याकडेला 24 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

3) मुरुम पो.ठा. च्या पथकाने तुगाव येथे छापा टाकला असता ग्रामस्थ- बाबु माने हे 17.55 वा. सु. तुगाव गावठाण येथे 25 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

4) उमरगा पो.ठा. च्या पथकास उमरगा येथील- शाहोबोद्दीन लदाफ हे 17.50 वा. सु. उमरगा येथील जुना भाजी मार्केट येथे 25 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

5) लोहारा पो.ठा. च्या पथकास जेवळी (द.) ग्रामस्थ- विनोद ढोंबे हे 19.55 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळ 10 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

6) ढोकी पो.ठा. च्या पथकास पारधी पिढी, तेर येथील- रमेश पवार हे 20.00 वा. सु. तेर बस स्थानकाजवळ 10 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

7) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास नळदुर्ग येथील- आकाश कांबळे हे 22.00 वा. सु. राहत्या गल्लीत 4 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top