लोहारा शहरात आ.ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक निधीतून विंधन विहिर मंजुर, नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांच्या हस्ते उद्घाटन
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक निधीमधुन प्रभाग क्रमांक 4 व 17 मध्ये विंधन विहिरी मंजुर करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 4 मधील विंधन विहिर माजी नगराध्यक्षा पोर्णिमाताई जगदिश लांडगे व प्रभाग क्रमांक 17 मधील विंधन विहिर ओम कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर करण्यात आल्या. प्रभाग क्रं.4 मधील कुरेशी गल्ली येथील विंधन विहिरीचे उद्घाटन दि.1 सप्टेंबर 2022 रोजी नगराध्यक्षा वैशालीताई अभिमान खराडे व प्रभाग क्रमांक 17 मधील बागवान गल्ली येथील विंधन विहिरी चे उद्घाटन नगरसेविका आरती कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, ओम कोरे, नगरसेवक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक अमिन सुंबेकर, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक जालिंदर कोकणे, ओम कोरे, रोहयो चे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, प्रेम लांडगे, दिनेश माळी, परमेश्वर चिकटे, समिर शेख, रब्बानी शेख, हबीब कुरेशी, जुबेर कुरेशी, शिवा कुंभार, मुनिर कुरेशी, राहुल रेनके, नितीन वाघे, मुबारक हिप्परगे, शिवन काडगावे, दत्ता क्षिरसागर, यासिन बागवान,'जब्बार बागवान, आकबर जेवळे, तात्या काडगावे, विष्णू कोरे, कलिम शेख, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.