शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आत्मक्लेष उपोषणाचा तिसरा दिवस
उमरगा :- ( दत्ता चौधरी )
अतिवृष्टी व गोगलगायीच्या नुकसानीच्या अनुदानातून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी वेदनांचा आक्रोश घेऊन दिनांक ३१ऑगस्ट गणेश चतुर्थी पासून सेवाग्राम कवठा येथे अन्न-पाणी त्याग करून मा.विनायकराव पाटील यांचे आत्मक्लेष उपोषण सुरू आहे.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज परिसरातील शेतकरी महिला भगिनींनी मोठी उपस्थिती लावली. सरकार जर आपल्या वेदना ऐकून घेत नसेल तर अश्या निर्दयी सरकार विरोधातील लढ्यात आम्ही आपल्या पाठीशी उभे राहून लढू अस अशवस्त या वेळी महिला भगिनींनी केलं.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत आपण परिसरातील शेतकऱ्यांचा आधारवड आहात आपणास उपोषणास बसवून आम्ही सण साजरा करण आम्हाला शोभणारही नाही व जमणार नाही म्हणून आपण उपोषण स्थगित करावं अशी विनंतीही यावेळी महिला भगिनींनी विनायकरावांना केली.