प्रथमत: नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात परत आणा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची घणाघाती टीका

0



प्रथमत: नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात परत आणा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची घणाघाती टीका

 Osmanabad :- 

            महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी मी व उस्मानाबाद-कळंब चे आमदार श्री. कैलास दादा पाटील यांच्या अविरत प्रयत्नांतून तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, श्री. शरद पवार साहेब  आणि माजी उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार साहेब, माजी पर्यटन मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे साहेब तसेच तत्कालीन आरोग्य मंत्री श्री. राजेशजी टोपे साहेब व माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. अमितजी देशमुख साहेब यांच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर करण्यात आले होते तसेच चालू अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येवून आवश्यक त्या बाबींची पुर्तता करुन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणेबाबत शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले हे सर्व श्रुत आहे. या गोष्टींचे आपणास श्रेय मिळत नसल्याने पोटसुळ उठलेले व स्वत:स जिल्ह्याचे भाग्यविधाता व पालकमंत्री समजणारे नेतृत्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावातील त्रुटीं पत्रकार परिषदेत सांगून केंद्रीय मंत्री श्री. मनसुखजी मांडवीया यांची भेट घेवून याबाबत प्रयत्न करणार असल्याचे वृत्तपत्रातून वृत्त प्रसारित करत आहेत. यांचा भुतकाळ पाहता 40 वर्ष सत्तेत विविध कॅबिनेट मंत्री पदी राहून तसेच तेरणा सहकारी साखर कारखाना एकहाती ठेवून तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सन 1991 मध्ये मंजूर असलेले वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ ला स्थापित करताना मनाची व जनाची लाज न बाळगता नेरुळ नवी, मुंबई सारख्या ठिकाणी सुरु केले या या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यर्थ्यांकडून करोडो रुपये कमवून महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत प्रयत्न करणे म्हणजेच सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली या उक्ती प्रमाणेच आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणुन व आत्तापर्यंत पालकमंत्री पदाची प्रतिक्षा यादीत असल्या कारणाने प्रयत्न करणे हे आपले कर्तव्यच आहे तसेच हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली मदत करण्यास तयार आहोत.

            कोरोना महामारीच्या काळामध्ये जनतेला वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रचंड आवश्यकता होती त्या काळामध्ये नेरुळचे महाविद्यालय हे धाराशिवसारख्या आकांक्षीत जिल्ह्याच्या ठिकाणी असते तर रुग्णांना अत्यावश्यक सेवा देवून होणारी हेळसांड थांबवता आली असती. धाराशिव जिल्ह्यातील काही रुग्णांना नेरुळ येथील रुग्णालयातून मोफत उपचार केल्याबाबत कर्णाच्या उदारतेने सांगितले जाते पण हे करत असताना याची दुसरी बाजू जनतेपासून व स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी सविस्तरपणे लपवून ठेवली जाते. सदर रुग्णांचे उपचार हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून केले जातात हे आजपर्यंत सांगण्याचे धाडस का केले नाही याचा जनता आज ना उद्या जाब विचारेल त्यावेळेस उत्तर द्याल का ? नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय हे खाजगी मालमत्ता असल्यासारखे आपण वागत आहात याचे अगोदर तेरणा ट्रस्टच्या सभासदांना स्पष्टीकरण द्यावे तसेच आत्तातरी मनापासून धाराशिव जिल्ह्यातील जनतेसाठी काही करत आहोत हे बेगडी वागणे आणि पत्रकार परिषद थांबवून प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवले तर जिल्ह्यातील जनतेला आनंदच होईल आपण व आपले पिताश्री यांच्या कारकिर्दीचा परिपाक म्हणुन धाराशिव जिल्हा हा विकासापासून कोसो दुर राहिला आहे. धाराशिव जिल्हा आकांक्षी जिल्हा आहे हे सांगताना आपणास जिल्ह्यासाठी एखादी बिरुदावली मिळालीच आहे. या तोऱ्यामध्ये

 

आपण आहात पण प्रत्यक्षात उस्मानाबाद जिल्हा हा आकांक्षी जिल्ह्यात समाविष्ठ असणे हे धाराशिव जिल्ह्याचे मागासलेपण सिध्द करते व आपले पिताश्री हे भारतातील श्रीमंत खासदाराच्या यादीत 3 ऱ्या क्रमांकाला होते त्याच बरोबर प्रत्यक्षपणे 2 पिढ्यांचा राजकीय वारसा लाभलेल्या राज्यकर्त्यांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण करते या सर्व गोष्टींचे प्रथमत: आत्म परिक्षण करुन जिल्ह्याच्या विकासासाठी आपण आणि आपल्या वडिलांनी काय योगदान दिले आहे हे जनतेस एक वेळ दाखवून द्यावे. उस्मानाबाद जिल्ह्याचा खरोखरच विकास केला असता तर जिल्ह्यातील 6.5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या जिल्ह्यातून पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी विस्थापित झाली नसती असे उद्गार दि. 01/09/2022 रोजी तुळजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर रस्त्याचा उद्घाटन समारंभ प्रसंगी जळकोट येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काढले तसेच श्री. शरद पवार साहेबांनी आपणास साध्या ग्रामपंचायतचे सदस्य नसतानादेखील सहा खात्याचे मंत्री केले होते या काळात आपणास धाराशिव जिल्ह्याचा विकास करता आला नाही आपण व आपल्या पिताश्रीवर कायम कृपादृष्टी ठेवणाऱ्या शरद पवार साहेबांसोबत विश्वासघात केला उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाचे कारण देत आपण भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे तरी आत्ता आपण या गोष्टींचा फायदा घेवून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष दुर करुन धाराशिव जिल्ह्यास विकासोन्वमुख जिल्हा म्हणुन ओळख निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करावे.

याप्रसंगी बोलताना तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकावल्याशिवाय स्वस्त राहणार नाही  गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्याला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 7 टी.एम.सी पाणी, उस्मानाबादचे धाराशिव नामांतरण, यांसारखे ऐतिहासिक निर्णय घेवून जिल्ह्याच्या विकासात भर पाडली आहे.

            यावेळी उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नंदु भैय्या राजेनिंबाळकर, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळीमहीला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणेमाजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाणजळकोट चे सरपंच अशोक भाऊ पाटीलमुर्टा चे सरपंच गोपाळ सुरवसेजळकोट उपसरपंच बसवराज कवठे,जळकोट वाडी चे सरपंच शिवाजी कदमशहरप्रमुख सुधीर कदमसुनील जाधवउपतालूका प्रमुख कृष्णनाथ मोरेअल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेखमुरुम नगरसेवक अजित चौधरीउपतालुका प्रमुख रोहित चव्हाणयुवा सेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगरशरद पाटीलमहेश पाटीलबाळकृष्ण घोडके पाटीलनळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदालेसरदारसिंग ठाकूरमेजर राजेंद्र जाधवलोहगाव सरपंच रविंद्र दबडेयुवासेना उपतालूकाप्रमुख दादा पाटीलमाजी सरपंच प्रसाद भोसलेराजेंद्र पाटीलधडाडीचे कार्यकर्ते गिरीष नवगीरेगजेंद्र पाटीलकार्यकारी अभियंता सुनीता पाटील मॅडम जीउप अभियंता अनिल जाधवसंगाप्पा धरणेमाजी सरपंच ज्ञानेश्वर भोसलेआत्माराम साळूंके, सरपंच रवींद्र दबडेसोशल मीडिया विभाग प्रमुख विकास सुरवसे दगडू नाना शिंदेरामराव पाटीलश्रीमंत हवेकरसुभाष गाढवेबजरंग धोंगडेकेरनाथ भरगंडेआप्पासाहेब पाटीलमोहन ढेकळेसंभाजी कोरेअमोल जेटीभोरनेताजी देवकरमेजर जाधव साहेब यांच्यासह नागरीक पदाधीकारी आणि शिवसैनीक उपस्थित होते.

           


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top