जुगार विरोधी कायदयाअंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीसांची कारवाई

0

जुगार विरोधी कायदयाअंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीसांची कारवाई


उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 02 सप्टेंबर रोजी शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, जुना बस डेपोच्या पाठीमागील शिवरत्न चौकाजवळील गुडी दादुमिया पवार यांचे पत्राचे शेडसमोर काही इसम जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 01.10 वा. सु. छापा टाकला असता तेथे उस्मानाबाद येथील रहिवाशी - 1.जाबेर जब्बार कुरेशी 2.शिवाजी शिम्मपा इटलकर 3.मिनाज इसमोदिन शेख 4.जाकीर मोमीन जब्बार  5. बबन शंकर शिंदे  6. दत्ता कार्या काळे 7.जाकीर मुनीर पठाण हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह 03 मोटारसायकल, 5 भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण 2,55,000 ₹ चा माल बाळगलेले असताना पथकास आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह रक्कम, भ्रमणध्वनी, मोटारसायकल जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोनि- श्री. उस्मान शेख, सपोनि- श्री. शांतीलाल चव्हाण, श्री. शंकर सुर्वे, श्री. बाबासाहेब कांबळे, सपोफौ- आरदवाड, पुरके, हावळे, पोहेकॉ- शेंडगे, मंगरुळे, पोकॉ- भोये, जाधवर, स्वामी यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top