उस्मानाबादमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची (PMFME) कृषी प्रक्रीया जागृती पंधरवाडा अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न - osmanabad

0

उस्मानाबादमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची (PMFME) कृषी प्रक्रीया जागृती पंधरवाडा अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न - osmanabad

 

           उस्मानाबाद, दि.02 (जिमाका):“आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME)राज्यात 2020-21 ते 2024-25 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या मार्गदर्शनासाठी कृषी प्रक्रीया जागृती पंधरवाडा (15-31 ऑगस्ट) अंतर्गत येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या डी.पी.डी.सी. सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

या कार्यशाळेस जिल्हयातील इच्छूक लाभार्थी, महिला बचत गट, बँक अधिकारी, शेतकरी गट, योजनेच्या सलग्न विभागांचे अधिकारी, कृषी विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये आलेल्या व्यक्तींना सुरूवातीला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद यांनी योजनेचे प्रास्ताविक सादर करून मार्गदर्शन  केले. यानंतर योजनेमधील तांत्रिक बाबी आणि ऑनलाईन अर्जाबाबत योजनेसाठी नियुक्त केलेले जिल्हा संसाधन व्यक्ती भडंगे आणि मराठे यांनी  मार्गदर्शन केले. यानंतर या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले  लाभार्थी यांचे प्रलंबित  कर्ज प्रकरणाविषयी चर्चा  करून बँकेचे अधिकारीमार्फत शंका निरसन करण्यात आले. 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी योजनेमधील लाभार्थीनां  योजनेची संकल्पना तसेच प्रकल्प राबविताना येणाऱ्या अडचणी याबांबत मार्गदर्शन केले आणि अधिकाअधिक लाभार्थ्यांनी  योजनेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले .    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top