नियमित लसीकरण अंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी जिल्हास्तरीय सूक्ष्म कृती नियोजन कार्यशाळा संपन्न

0

नियमित लसीकरण अंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी जिल्हास्तरीय सूक्ष्म कृती नियोजन कार्यशाळा संपन्न

उस्मानाबाद,दि.02(जिमाका):  येथील जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने नियमित लसीकरण अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागासाठी सूक्ष्म कृती नियोजन कार्यशाळा घेण्यात आली. 

              या कार्यशाळेत जिल्हाशल्यचिकित्सक यांनी मार्गदर्शन करताना  ग्रामीण भागा  प्रमाणे शहरी भागात देखील या पुढे एकही गरोदर माता आणि बालक  नियमित लसीकरणापासून वंचित राहणार नाही या साठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या कार्यशाळेत डॉ. घोडके (WHO), जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक आयोजित करून पुढील नियोजन करण्यात येणार आहे.

               यावेळी जिल्हास्तरावरून जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र तथा जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, युनिसेफ सल्लागार तसेच बैठकीत सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी (प्रभारी) हे उपस्थित होते.

             ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top