सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा,
3 आठवड्यात शेतकऱ्यांना विम्याचे पैसे द्या,सर्वोच्च न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश
* शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौकामध्ये आतिषबाजी, एकमेकांना पेढे भरून शेतकऱ्यांनी केले निर्णयाचे स्वागत
Osmanabad : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप 2020 साली अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. आता भरपाई मिळणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे धाराशिव शहरातील शिवाजी चौकामध्ये शेतकऱ्यांनी मिठाई वाटून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे यावेळी मोठी आतिषबाजी ही करण्यात आली या शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई 3 आठवड्यात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना 510 कोटी रुपयाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2022 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं असं असलं तरी सरकारने व विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत केली नव्हती. याच्या विरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठानेही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. विमा कंपनी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल देताना विमा कंपनीला शेतकऱ्यांचे तीन आठवड्याच्या आत विम्याचे पैसे देण्याच्या आदेश दिले आहेत. या निर्णयाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, सुनिल काकडे, ॲड खंडेराव चौरे, युवराज नळे, अभय इंगळे, राजाभाऊ पाटील, धनंजय रणदिवे, प्रदिप शिंदे, प्रविण पाठक, प्रविण सिरसाठे, इंद्रजित देवकते, राजाभाऊ पवार, दत्ता पेठे, लक्ष्मण माने, विनोद निंबाळकर, प्रितम मुंडे, राज निकम, संदिप कोकाटे, सचिन लोंढे, प्रसाद मुंडे, विनायक कुलकर्णी, स्वप्नील नाईकवाडी, मेसा जानराव, सागर दंडनाईक व इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.