इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या लातूर जिल्हा अध्यक्ष पदी तौफिक कुरेशी
पत्रकारांच्या समस्यांच्या विरोधात आवाज उठविणार इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन-तौफ़ीक कुरेशी
लातूर, महाराष्ट्र
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार तसेच मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश महासचिव व्यंकटेश सूर्यवंशी यांच्या सहमतीने मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांनी औसा जि. लातूरचे पत्रकार, न्यूज 24 लातूरचे मुख्य संपादक तौफिक कुरेशी यांची इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. तौफिक कुरेशी यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये शहरासह गावातील पत्रकारांना जोडून पत्रकार हिताचे रक्षण करून त्यांचे उत्पीडन थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. तौफिक कुरेशी यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे.
तौफिक कुरेशी यांना मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश महासचिव व्यंकटेश सूर्यवंशी, शेख शाहबाज़ यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
तौफिक कुरेशी यांची लातूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मोहम्मद परवेज़, गिरिराज सिंह, सलमान अहमद, सनोबर अली कुरेशी एडवोकेट, रंजीत सम्राट (बिहार प्रदेश अध्यक्ष), मो. सुल्तान अख्तर, नसीम रब्बानी, के.एम. राज, हाशिम रिजवी, राजकुमार यादव, विजय मद्देशिया, पंकज झा, अवनीश त्रिपाठी, अश्फाक आरिफ खान (जबलपुर), देवेंद्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), व्यंकटेश सूर्यवंशी (प्रदेश महासचिव, मराठवाडा, महाराष्ट्र), शेख नबी सिपोराकर (मराठवाडा उपाध्यक्ष), जावेद पठाण (मराठवाडा कोषाध्यक्ष), फारूख शेख (जिल्हा अध्यक्ष, जळगांव), शेख उमर (जिल्हा अध्यक्ष, जालना), शकील अहमद (जिल्हा अध्यक्ष, परभणी), सैय्यद मिन्हाजउद्दीन (जिल्हा अध्यक्ष, बीड), अयाज अहमद खान (जिल्हा अध्यक्ष, मुंबई), जैनोद्दीन पटेल (जिल्हा अध्यक्ष, नांदेड), फय्याज कुरेशी (जिल्हा अध्यक्ष, वाशिम), कृष्णा रौराले, लक्ष्मण राजुरकर आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.