अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी जिवा सेनेची मागणी
उस्मानाबाद- सेलु जिल्हा परभणी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीची निवेदन जिवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सेलू जिल्हा परभणी येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी पिडीत मुलगी व तिच्या भावाला सेलू येथून अपहरण करून गाडीवर बसवून बोरी तालुका जिंतूर येथे दोन नराधमांनी आणले होते मुलाला कौसडी फाटा येथे सोडून देऊन मुलीला केक शिवारात निघून अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला ही घटना माणूसकिला काळीमा फासणारी असून नाभिक समाजातील मुलीवर अत्याचार झाला आहे या घटनेतील नराधमांना पोक्सो कायदा व बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवून याकामी प्रसिद्ध विधिज्ञ ऍड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना शासनाकडून त्वरीत न्याय व आर्थिक मदत देण्यात यावी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा जिवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,रवींद्र राऊत,राजेंद्र माने, मंगेश गोरे, बाळासाहेब शेटे,किशोर राऊत, सुरेश चौधरी, अक्षय माने, रमेश जगदाळे ,उमेश दळवी, गणेश वाघमारे ,बालाजी गोरे ,मनोज लाडूळकर ,मनोज पवार ,प्रशांत लाडूळकर यांच्या स्वाक्षरी आहेत