शिवसेना ठाकरे गटाला धक्का ! वाकरवाडीच्या सरपंच उज्वला ढवारे यांचा भाजपात प्रवेश !

0



शिवसेना ठाकरे गटाला धक्का ! वाकरवाडीच्या सरपंच उज्वला ढवारे यांचा भाजपात प्रवेश !

 

उस्मानाबाद तालुक्यातील वाकरवाडी येथील शिवसेनेच्या (ठाकरे) गटाच्या  सरपंच सौ. उज्वलाताई बंडू ढवारे यांनी भाजप नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. सरपंच पती श्री. बंडू विठ्ठल ढवारे यांनीही भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. सदरील प्रवेशासाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री. प्रमोद देशमुख यांनी पुढाकार घेतला. वाकरवाडीचे भाजप नेते लालासाहेब शिंदेउपसरपंच गणेश रामभाऊ पवारग्रा. प. सदस्य विजयकुमार शिंदेमहादेव शिंदेविकास पवारज्ञानेश्वर शिंदेअमर शिंदेअण्णा ढवारे आदी उपस्थित होते. ढोकी जि. प.गटात वाकरवाडी हे गाव सेना खासदार व आमदार यांचं गड समजला जात होता. भाजपने या गडातच सुरुंग लावत सेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरपंच सौ. उज्वलाताई ढवारे यांचे भाजपात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. खरीप २०२० चा प्रलंबित पिकविम्याचा यशस्वी लढा देऊन सर्वोच्च न्यायालयातुन  शेतकऱ्यांचा हिताचा 'सर्वोच्च'  निकाल आणल्याबद्दल ढोकी जि. प.गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा सत्कार केला.

 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळेतालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंतराव देशमुखझुंबर बोडकेजेष्ठ नेते गोविंदभाऊ तिवारीजेष्ठ नेते सतिश देशमुखतालुका उपाध्यक्ष प्रमोद देशमुखबारीसाहेब काझीएजाज काझीविलास रसाळकिशोर परीटप्रभाकर गाढवेकाका पाटीलसंजय घनघावेविश्वजित लंगडेशाहजी कांबळेजावेद सय्यदपवन वाघमोडेशिव सुरवसेभाऊसाहेब गरडइनायत काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top