google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे फेब्रुवारी २०२४ मध्ये जलपूजन - पालकमंत्री सावंत

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे फेब्रुवारी २०२४ मध्ये जलपूजन - पालकमंत्री सावंत

0

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे फेब्रुवारी २०२४ मध्ये जलपूजन - पालकमंत्री सावंत

उस्मानाबाद (प्रतिनिधी) 
     कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पहिला टप्प्यातील कामांना शिंदे फडणवीस सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून ही काम वेळेत पूर्ण होऊन फेब्रुवारी 2024 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आणणार आणि या पाण्याचे जलपूजन करणार असल्याचा निर्धार पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आज व्यक्त केला. ते आज उस्मानाबाद इथं जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत बोलत होते. 


यावेळी पालकमंत्र्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यात शेतीला पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध करून देणे, गौण खनिज उत्खनन प्रकरणी स्टोन क्रशर चालकांवर केलेल्या दंडात्मक कारवाई बाबत, जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कामांच्या संदर्भात झालेल्या दप्तर दिरंगाई,तसेच अनियमितता तपासून दोषींवर कडक कारवाई करणे, उस्मानाबाद येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचे बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर पुनर्जीवन करणे, यासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. 


या बैठकीला आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top