आ.ज्ञानराज चौगुले यांनी सामाजिक भावना जपत लांडगे यांच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजाराची एफडी केलेले प्रमाणपत्र वाटप
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील उमाकांत लांडगे यांचे निधन झाल्यामुळे यांच्या घरी आ.ज्ञानराज चौगुले यांनी भेट देऊन सांत्वन करुन यांच्या कुटुंबीयांना धिर देऊन सामाजिक भावना जपत उमाकांत लांडगे यांच्या मुलीच्या लग्नासाठी शहरातील ज्ञानज्योती पतसंस्थेत दि.19 डिसेंबर रोजी 50 हजार रुपयाची मुदत ठेव करुन मदत केली. ज्ञानज्योती पतसंस्थेत
एफडी केलेले प्रमाणपत्र लांडगे यांची मुलगी क्षीतीजा लांडगे व यांची पत्नी अनिता उमाकांत लांडगे यांना नगराध्यक्षा सौ. वैशालीताई अभिमान खराडे व नगरपंचायतीच्या गटनेत्या तथा ज्ञानज्योती पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सारिका प्रमोद बंगले, ज्ञानज्योती पतसंस्थेच्या सचिव मिरा अविनाश माळी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.