मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पेन्शनर्स डे साजरा

0

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पेन्शनर्स डे साजरा

उस्मानाबाद :  मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ   उस्मानाबाद  जिल्हा शाखेच्या वतीने पेन्शनर्स डे  उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी 17 डिसेंबर हा दिवस पेन्शनर्स डे  म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने शनिवारी (17 डिसेंबर) मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ,उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी कर्मचारी संघाचे केंद्रीय प्रमुख सल्लागार श्रीकांत माळlळे यांनी सर्वांना पेन्शनर्स डे दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनेची कामे सर्व सदस्यांनी एकत्रित पणे करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अरुण बनसोडे, उपाध्यक्ष सुनील बनसोडे, प्रभाकर बनसोडे, ऍड.सचिव सुदेश माळlळे,सह सचिव राजन माने, चंद्रशेखर ढाले, संघटक विजय गायकवाड, दीपक सरवदे, सुनील बनसोडे  आदी सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top