उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ७६.४९ मतदान
उस्मानाबाद ( Osmanabad news ) जिल्ह्यामध्ये 166 ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया काल 18 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पूर्ण झाली यामध्ये जिल्ह्यामध्ये 76.49% मतदान झाले आहे.
यामध्ये प्रत्यक्षात 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असून 658 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये 1 लाख 28 हजार 376 महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून 1 लाख 50 हजार 885 पुरुषांनी मतदान केले आहे. एकूण दोन लाख 79 हजार 261 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात 74.92% टक्के , तुळजापूर तालुक्यात 81.79 %टक्के , उमरगा तालुक्यात 72.81 %टक्के , लोहारा तालुक्यात 71.28 % , कळंब तालुक्यात 79.71% टक्के , वाशी तालुक्यात 81.92%, भूम तालुक्यात 77.76 %टक्के व परंडा तालुक्यात 85.28 टक्के मतदान झाले आहे.