उस्मानाबाद : जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायतचे निवडणूक सुरू आहे. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये 31.89% मतदान झाले आहे. उस्मानाबाद तालुक्यामध्ये 28.76% तुळजापूर तालुक्यामध्ये 38.7% उमरगा तालुक्यामध्ये 31.3% लोहारा तालुक्यामध्ये 29.51% कळंब तालुक्यामध्ये 30.86% वाशी तालुक्यामध्ये 35.59% भूम तालुक्यामध्ये039.58% तर परंडा तालुक्यामध्ये 42.87% मतदान झाले आहे.
उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी सारोळा येथे सह पत्नी मतदानाचा हक्क बजावला आहे. व ग्रामस्थांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले . तसेच राज्याचे माझी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांनी व
तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर येथे परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे.