आयुष चा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ.राज पाटील-गलांडे

0

आयुषचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ.राज पाटील-गलांडे

 

उस्मानाबाद,दि.16(जिमाका):- जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा जिल्हा रुग्णालये तुळजापुर, कंळंब आणि परंडा येथे आयुष (आयुर्वेद, युनानी, होमीओपॅथी) तज्ञ आयुष वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालय भुम येथे आयुष (होमीओपॅथी) तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालय वाशी येथे आयुष (आयुर्वेद व होमीओपॅथी) तज्ञ आणि आयुष अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालय येथे पंचकर्म (स्नेहन, स्वेदन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती, विरेचन) आणि योगशिक्षका मार्फत योगाबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच युनानी (कपिग थेरपी, इलाज बित तदबिद आदी) ची सोय उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय, परंडा, कंळंब आणि तुळजापूर येथे लवकरच पंचकर्म व युनानी ची सोय उपलब्ध होणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 30 खाटांचे जिल्हा आयुष रुग्णालय मंजूर झाले आहे. या रुग्णालयाकरिता जिल्हास्तरावर जागा मिळण्याकरिताचे काम प्रगतीपथावर आहे.

2017 पासून आयुषची रुग्णसंख्या मध्ये वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये वार्षिक ओपीडी एक लाख 97 हजार 157 एवढी होती, 2018-19 मध्ये वार्षिक ओपीडी दोन लाख 23 हजार 832, 2019-20 मध्ये वार्षिक ओपीडी दोन लाख 36 हजार 363 एवढी होती, 2020-21 मध्ये वार्षिक ओपीडी दोन लाख 26 हजार 09 एवढी होती, 2021-22 मध्ये वार्षिक ओपीडी एक लाख 54 हजार 445 एवढी होती, 2020-21 आणि 2021-22 मध्ये कोविड या आजारामुळे वार्षिक ओपीडी वर परिणाम झाला आहे. यामध्ये सर्व यंत्रणा ही कोविड- 19 चे कामकाज करत होती. तरी संबंधित संस्थेच्या उस्मानाबाद, तुळजापुर, उमरगा, परंडा, कंळंब, भुम आणि वाशी येथील नागरिकांनी आयुष पॅथीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राज पाटील-गलांडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top