google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 समाधान ॲपची निर्मिती कौतुकास्पद ; ॲपमुळे येणार प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणि गती - पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत

समाधान ॲपची निर्मिती कौतुकास्पद ; ॲपमुळे येणार प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणि गती - पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत

0




समाधान ॲपची निर्मिती कौतुकास्पद ; ॲपमुळे येणार प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणि गती - पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत

 

उस्मानाबाद,दि.16(जिमाका):- समाधान ॲपची निर्मिती हे कौतुकास्पद काम असून या ॲपमुळे प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणि गती येईल. त्यामुळे फार वेळ जाणार नाही. कामाचा निपटारा जलदगतीने होईल असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी सांगितले.

       या ॲपच्या उपयोगितलेबद्दल बोलताना पालकमंत्री म्हणाले, नागरिकांची अपेक्षा लवकरात लवकर काम व्हावे अशी असते, छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांची कामे अडलेली असतात. या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा निर्माण होणार असून प्रशासनालाही या सुसूत्रतेमुळे काम करणं सुलभ होईल परिणामी कामाला गती येईल. अडकलेल्या कामाचा लवकरात लवकर निपटारा होईल.

            पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी जिल्हा प्रशासन सध्या ज्या पध्दतीने काम करत आहे. त्याच पध्दतीने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली असून प्रशासनास लागेल त्यावेळी मदत करण्याची ग्वाही दिली. शासन आणि प्रशासन या दोघांनी मिळून काम केले तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, कामे लवकर मार्गी लागतील. त्यामुळे आपला जिल्हा प्रगतीचा नवा मार्ग निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला.

 

समाधान ॲप वापरावे कसे ?

▪ हे समाधान ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आले. हे ॲप अँड्रॉइड मोबाईलवर डाऊनलोड करता येते.

▪ समाधान ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये नागरिकांनी स्वत:ची नोंदणी करावयाची आहे. 

▪ ॲप डाऊनलोड केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी व्दारे नागरिकांची पडताळणी केली जाते.

 ▪ या पडताळणीनंतर नागरिकांना आपली तक्रार या ॲपच्या माध्यमातून करता येईल.

▪ ही तक्रार ॲपच्या माध्यमातून संबंधित विभागाला तात्काळ प्राप्त होईल.

▪ संबंधित विभाग तक्रार निवारणाच्या कार्यवाहीला सुरुवात करतील.

▪ नागरिकांच्या केलेल्या तक्रारीवर 15 दिवसाच्या आत लेखी उत्तर समाधान ॲपवर द्यायचे आहे. त्यानंतरच संबधित तक्रार निकाली काढण्यात येईल.

▪ निकाली काढलेल्या तक्रारी बाबत नागरिकांना प्रतिक्रिया देण्याची सुविधा या ॲप मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात समाधानी / असमाधानी असे पर्याय उपलब्ध आहेत.

▪ समाधान / असमाधान या शेऱ्यावरून कार्यालयाची कार्यक्षमता क्रमवारी निश्चित करण्यात येणार आहे.

▪ हे समाधान ॲप मे.शौर्य टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून विकसीत करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top