भूकंपग्रस्त कुटूंबांना मंजूर घरांचे-भूखंडाचे मालकी प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार आता उपविभागीय अधिकारी यांच्याकडे

0

भूकंपग्रस्त कुटूंबांना मंजूर घरांचे-भूखंडाचे मालकी प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार आता उपविभागीय अधिकारी यांच्याकडे

 

उस्मानाबाद,दि.16(जिमाका):- जिल्ह्यातील दि. 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर शासनाने भूकंपग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम तातडीने हाती घेवून भूकंपग्रस्त भागातील उमरगा तालुक्यातील 10 आणि लोहारा तालुक्यातील 16 अशा एकूण 26 “अ” वर्गवारीच्या गावाचे पूर्णत: नव्याने पुनर्वसन करून या गावातील भूकंपग्रस्त लाभार्थी कुटूंबांना शासनाने आणि स्वंयसेवी संस्थांमार्फत बांधण्यात आलेल्या घरांचे वाटप केले आहे. तसेच उमरगा तालुक्यातील 09 लोहारा तालुक्यातील 03 अशा एकूण 12 “ब” वर्गवारीच्या गावातील लाभार्थी कुटूंबांना शासनाच्या घर दुरुस्ती अनुदानातून आणि अशासकीय संस्थांच्या मदतीने घरे बांधून देण्यात आली होती. अशा कुटूंबांना त्या घरांचे, भूखंडाचे वाटप केल्यानंतर संबंधित पात्र भूकंपग्रस्त लाभार्थी कुटूंबांना मंजूर घरांचे, भूखंडाचे मालकी प्रमाणपत्र (कबाला) निर्गमित करण्याचे अधिकार सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या दि. 06 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये, शासनाच्या गतीमान आणि प्रभावी प्रशासन या धोरणास अनुसरुन भूकंपग्रस्तांना स्थानिक पातळीवर सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्हयातील उमरगा, लोहारा तालुक्यातील “अ” आणि “ब” वर्गवारी गावातील भूकंपग्रस्त पात्र लाभार्थी कुटूंबांना भूकंप पुनर्वसन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घराचे, भूखंडाचे मालकी प्रमाणपत्र (कबाला) निर्गमीत करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी उमरगा यांना प्रदान केलेले आहेत. हे आदेश दि. 06 डिसेंबर 2022 पासून लागू राहतील, असे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी आंधळे यांनी कळविले आहे.

*****



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top