ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी कामगारांना तीन तासांची सुट्टी
उस्मानाबाद,दि.16(जिमाका):- ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी 07.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान क्षेत्रात असलेल्या कामगार, अधिकारी, कर्मचारी, निवडणूक क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तीन तासांची सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.