डॉ. आंबेडकर चौकात मनुस्मृती दहन दिन साजरा
उस्मानाबाद दि.२५ (प्रतिनिधी) - शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात दि.२५ डिसेंबर रोजी मनुस्मृतिचे सार्वजनिकरित्या दहन करुन मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला.
उस्मानाबाद शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करुन मानवास त्यांचे अधिकार बहाल करून खऱ्या अर्थाने मानवास मुक्ती मिळाली.
त्यामुळे केक कापून आनंद व्यक्त करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष तर मनुस्मृतीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस धनंजय वाघमारे, शहराध्यक्ष विजय गायकवाड, तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, मुकेश मोटे, बाबासाहेब कांबळे, शशिकांत माने, श्रीकांत साठे, विद्यानंद बनसोडे, संपत जानराव, सोमनाथ गायकवाड, अक्षय पाचपिंडे, सिद्धार्थ ओव्हाळ, शिलाताई चंदनशिवे, बापू देढे, महादेव भोसले, पृथ्वीराज चिलवंत, सुदेश माळाळे, आकाश इंगळे, प्रभाकर सोनवणे, राजेंद्र धावारे, आप्पासाहेब सिरसाटे, सुनील माळाळे, अतुल लष्करे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.