जिल्हा दिव्यांग व्यक्ती कल्याण व पुनर्वसन समितीसाठी अर्ज सादर करावेत : नागनाथ चौगुले
उस्मानाबाद,दि.12(जिमाका):- पालकमंत्री यांच्याद्वारे नियुक्त करण्यात येणारे जिल्ह्यातील विविध विभागाच्या समित्यांचे गठण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. जि.प.च्या जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्याशी संबंधित दिव्यांग व्यक्ती (हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 आणि सुधारित अधिनियम 2016 ची अंमलबजावणी करण्याकरिता “जिल्हा दिव्यांग व्यक्ती कल्याण व पुनर्वसन समिती” या समितीचे शासन निर्णयातील तरतुदीनुसार नव्याने गठण करावयाचे आहे. त्यासाठी स्वयंसेवी अशासकीय दिव्यांग संस्थाचे पाच प्रतिनिधी (प्रत्येकी दिव्यांग प्रवर्गातील उदा. अंध-1, अस्थिव्यंग-1, मुकबधीर-1, मतिमंद-1, दिव्यांग-1 आदी) प्रवर्गातून या समितीवर कार्य करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
याप्रमाणे 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती ही जिल्ह्याचे पालकमंत्री करतील त्याकरिता ज्या व्यक्तींना जिल्हा दिव्यांग व्यक्ती कल्याण व पुनर्वसन या समितीवर कार्य करावयाचे आहे, अशा व्यक्तींनी दि.20 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज जि.प.च्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयाकडे योग्य त्या कागदपत्रासह सादर करावेत, असे अवाहन जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.