उस्मानाबाद तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो आजी-माजी पदाधिकार्‍यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

उस्मानाबाद तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो आजी-माजी पदाधिकार्‍यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

पालकमंत्री डॉ. सावंत यांचे नेतृत्व आणि जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या पुढाकाराने शिवसेनेची ताकद वाढली

उस्मानाबाद -
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख  सुरज साळुंके यांच्या पुढाकारातून उस्मानाबाद तालुक्यातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते देवदत्त मोरे, तडवळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्याचे पती शहाजी वाघ, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर करंजकर, उपसरपंच प्रताप करंजकर यांच्यासह तडवळे, येडशी, जवळा येथील विविध पक्षातील शेकडो आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. सुरज साळुंके यांनी जिल्हाप्रमुख पदाची धुरा हाती घेतल्यापासून इतर विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेेनेत जाहीर प्रवेश करत असल्यामुळे पक्षाची ताकद दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख  सुरज साळुंके, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. मंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

कार्यक्रमात जवळ्याचे उपसरपंच आप्पासाहेब गुळवे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष धनके, गणेश करंजकर, धनंजय भालेराव, विजय पवार, सोमनाथ करंजकर, योगेश भोगले, सुनील डिकरे, हरून शेख ग्रामपंचायत सदस्य कसबे तडवळे, लखन वाघमारे सदस्य जवळा, किशोर कदम, बाळासाहेब करंजकर तसेच धाराशिव तालुक्यातील राष्ट्रवादी युवकचे उपजिल्हाअध्यक्ष जयंत शहाजी भोसले माजी उपसरपंच येडशी गावचे उपसरपंच शशांक गोपाळराव सस्ते, तुषार शहाजी शिंदे ग्रा पं सदस्य, नितीन दत्तात्रय शिंदे सदस्य, संतोष काशिनाथ पवार सदस्य, मच्छिंद्र मोहन पवार सदस्य, गुरुनाथ रामलिंग शिंदे सदस्य, अविनाश विलास तौर सदस्य, सुनील अशोक पाटील सदस्य, सोमनाथ बाबुराव बेदे सदस्य, प्रताप दामोदर ढोणे सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती अकबर मेहबूब तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सिद्धेश्वर तोडकरी, अजय विष्णू पवार, सोनू गरड, शिवाजी नलावडे, अ‍ॅड.धैर्यशील सस्ते, रोहित भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांची प्रेरणा घेऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मार्गक्रमण करत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्य सरकारने केलेली विविध लोकोपयोगी विकासकामे तसेच सर्व स्तरातील घटकांकरिता घेतलेले निर्णय लक्षात घेऊन अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत. धाराशिव जिल्ह्याने कायमच शिवसेनेचा विचार बळकट करण्याचे काम केले आहे, त्याच धाराशिव जिल्ह्यातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून सामील होणार्‍या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासित करून या सर्वांचे मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी पक्षात स्वागत केले तसेच त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top