अवैध गोवंशीय मांसाची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0


अवैध गोवंशीय मांसाची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा पोलीस ठाणे : परंडा पोलीस ठाण्याचे पथक दि. 19.01.2023 रोजी 16.00 वा.सु. पो.ठा. हद्दीत परंडा ते जवळा (नि) रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. दरम्यान  परंड्याचे  दिशेने  टाटा टेम्पो क्र. एम.एच. 42 ए एफ 1675 येत असताना पथकास दिसल्याने पथकाने त्यास थांबण्यास सागिंतले. पथकाने संशयावरून चालकास विचारपुस केली असता त्याने आपले नाव- खाजा नरूद्दीन सय्यद वय 30 वर्षे रा.सुनिलनगर, ता. सोलापुर असे सागिंतले. टेम्पोतून दुर्गंधयुक्त पाणी गळत असल्याने पथकाने संशयावरून टेम्पोचे पाठीमागे हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय मांस व दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद टेम्पो चालक- खाजा सय्यद यास त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 5,00,000 ₹ किंमतीच्या नमूद टेम्पोसह त्यातील अंदाजे 2,00,000 ₹ किंमतीचे सुमारे 2 मेट्रीक टन गोवंशीय मांस जप्त करुन जवळा निजाम चे पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्फत प्रयोगशाळा परिक्षणाकरीता मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तात्काळ नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांच्याकडे विनंती पत्र पाठवले असून त्यांची संमती मिळताच तो मांस साठा नष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- सुशिलकुमार कोळेकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 9, 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- श्री. भुजबळ, पोलीस अमंलदार- काकडे, मिसाळ, माने, यादव यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top