जिल्हा रुग्णालयातील सी.टी. स्कॅन मशीन तात्काळ दुरुस्त करावी व एम आर आय ची सुविधा उपलब्ध करावी ( फोटो संग्रहित )
उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील सी. टी. स्कॅन मशीन मागील 4 दिवसांपासून नादुरुस्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत तसेच रुग्णांना खाजगी रुग्णालयातून सी. टी. स्कॅन करावा लागत असल्यामुळे रुग्णांचा वेळ खाजगी रुग्णालयामध्ये सी. टी. स्कॅन करण्यास जात आहे. तसेच खाजगी रुग्णालय सी. टी. स्कॅन करीता फीस मोठ्या प्रमाणात आकारत असल्यामुळे रुग्णांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडत असून रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील ( उस्मानाबाद नवीन वैद्यकीय महाविद्यालय ) येथील सी. टी. स्कॅन मशीन तात्काळ दुरुस्त करावी व या ठिकाणी एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी एम आर आय साठी नागरिकांना खाजगी रुग्णालयामध्ये भरमसाठ पैसे भरून वेळेवर सुविधा मिळत नाहीत तसेच खाजगी रुग्णालयामध्ये काही अडचण आल्यास दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये एमआरआयची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.