सय्यद बादशाह हनीफ यांना तीस वर्ष विना अपघात सेवा पदकाने सन्मानित

0

सय्यद बादशाह हनीफ यांना तीस वर्ष विना अपघात सेवा पदकाने सन्मानित

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ उस्मानाबाद आगारात कार्यरत असणारे सय्यद बादशाह हनीफ यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 30 वर्ष विना अपघात सेवा केल्याबद्दल सन्मान चिन्ह , समान पदक ( बिल्ला ) व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र परिवहन मुख्य कार्यालय उस्मानाबाद येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डि. सी. खिरवाळकर मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सय्यद परिवाराचा सत्कार करण्यात आला यावेळी परिवहन महामंडळ कार्यालयातील सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



सय्यद परिवाराचा आ.कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार 


 तीस वर्ष विना अपघात परिवहन महामंडळ क्षेत्रात कार्य केल्याबद्दल महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला याची दखल घेऊन उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आ. कैलास पाटील यांनी देखील पवन राजे कॉम्प्लेक्स येथे सय्यद बादशाह हनीफ यांच्यासह पूर्ण कुटुंबाचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top