पंचायत समिती कनिष्ठ सहाय्यकास दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

0
उस्मानाबाद  : दि.01 फेब्रुवारी 2023 रोजी तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती उमरगा येथे गोठ्याचे सेड बांधकाम अनुदान मिळणे कामी दाखल केलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी आरोपी लोकसेवक  बुद्धार्थ ग्यानु झाकडे,वय  55 वर्षे, कनिष्ठ सहाय्यक ,पंचायत  समिती कार्यालय जि.उस्मानाबाद (वर्ग-3) यांनी 2000/-रुपये लाचेची मागणी करून लागलीच 2000/- रुपये लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली आहे ची माहिती लाच लुचपत विभाग उस्मानाबाद यांच्या वतीने देण्यात आले आहे.                         

ही कारवाई सापळा अधिकारी विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.7719058567 यांनी मार्गदर्शक मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मो.न.9923023361 मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994 यांच्या मार्गदर्शनाखाली मा. प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.9527943100 सापळा पथक - पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांनी केली आहे

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top