यशवंतराव चव्हाण यांची जयंती शिंगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरी
त्यांना लहानपणापासून संगीत, साहित्य यांची आवड होती. मातृभाषा, मातृभूमीबद्दल त्यांना प्रचंड प्रेम होते. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, संरक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. भारत व चीन युद्धामध्ये त्यांनी संयमाने गृहमंत्री पदाची जबाबदारी मोठ्या ताकतीने पार पाडली. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या. त्यांच्या नावाने नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची सोय त्यांनी केली. अशा या थोर नेत्याचा विद्यार्थ्याने डोळ्यासमोर आदर्श ठेवून आपल्या देशासाठी कार्य केले पाहिजे.
असे मार्गदर्शन शेख अब्बास अली यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन, सुधीर कांबळे यांनी केले, या कार्यक्रमासाठी सूर्यकांत बर्दापुरे, जाधव चंद्रकांत, खंडू पडवळ, शानिमे कैलास, राठोड विशाल, राठोड सचिन, राठोड प्रशांत, मदन कुमार अहमदापुरे, इत्यादी शिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, बबन चव्हाण, रेवा चव्हाण, सचिन माळी, अविनाश घोडके, अमोल जगताप, मस्के मामा इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. आभार सतीश कुंभार सर यांनी मानले.